You are currently viewing देहातली पंचतत्वे

देहातली पंचतत्वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*देहातली पंचतत्वे*

****************

जीवात्म्याला या जगविती

देहातली पंचरंगली पंचतत्वे

आत्मरंगल्या प्रीतभावनांना

भक्तीरंगात डुंबवती पुण्यत्वे….

 

टाळ मृदंग चिपळ्यांचा नाद

ब्रह्मसुखाचा आनंद सोहळा

थिरकता , पाऊले वाळवंटी

लोचनात ओघळतो सावळा….

 

दंगती सुखे , अभंगी कीर्तनी

तुका ज्ञाना नामा चोखामेळा

अवघे ब्रह्मान्ड अवतरले धरी

जमला साऱ्या संतांचा मेळा….

 

पाहता विश्वात्मक रूप हरिचे

दिंडीतुनी वैष्णव नाचनाचला

गजरात विठ्ठलाच्या दंग सारे

त्रैलोक्यातुन हरिहर भारलेला….

***********************

*#©️ वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा