जर्मनीस जाण्यासाठी वाहनचालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जर्मनी देशातील बाडेन बुटेनवर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. कुशल मनुष्यबळामध्ये अवजड वाहनाचा वैध परवाना असणाऱ्या वाहनचालकांचा समावेश आहे. तरी या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले आहे.
या प्रकल्पाअंतर्गत जर्मनीस जाण्यासाठी इच्छुक वाहनचालकांच्या नोंदणीसाठी शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या QR Code वर स्कॅन करून त्यावर दिलेल्या प्रवेशप्रक्रियेबाबतचा अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी www.maa.ac.in /Germany employment या संकेतस्थळास भेट द्यावी.
या प्रकल्पाअंतर्गत उमेदवारास जर्मन भाषा येणे अनिवार्य आहे. तथापि जर्मन भाषा प्रशिक्षणाबाबतची कार्यवाही व जर्मनी देशातील वाहनचालकांकरिता असेलेले नियम व अभ्यासक्रम यासाठी उमेदवारासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही शासनामार्फत करण्यात येणार आहे. शासननिर्णयामध्ये दिल्यानुसार उमेदवाराचा सर्व खर्च हा शासन करणार आहे. असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.
सोबत : QR Code