You are currently viewing मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर कॅरम व बुदधिबळ स्पर्धेत प्रथम

मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर कॅरम व बुदधिबळ स्पर्धेत प्रथम

सावंतवाडी :

मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर हीने शालेय कॅरम आणि बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.गेली तीन वर्षे तीने आपला दबदबा कायम ठेवला आहे.साक्षीने शालेय आणि असोसिएशनच्या कॅरम व बुदधिबळ स्पर्धांमध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर निर्विवाद यश मिळवले आहे.*असा पराक्रम करणारी ती जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरली आहे.* युवराज लखमराजे भोंसले यांनी साक्षी आणि इतर विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

साक्षीसोबत मुक्ताई ॲकेडमीचे सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, मालवण, दोडामार्ग येथील कॅरम व बुदधिबळ खेळाडू यथार्थ डांगी, पार्थ गावकर, किमया केसरकर, अर्श पोटफोडे, सोनल मराठे, स्मित सावंत, आस्था लोंढे, रुद्र चव्हाण, गौरांगी परब, अनुजा सावंत इत्यादी सोळा विदयार्थी, विदयार्थिनींची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.मागील दहा वर्षात ॲकेडमीत प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो विदयार्थ्यांमधील बारा विदयार्थी आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त असुन राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर तीस विदयार्थी पारितोषिक विजेते आहेत.*राज्य स्तरावरील “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार मिळवणारी मुक्ताई ॲकेडमी कोकणातील एकमेव ॲकेडमी आहे.*

प्रतिक्रिया व्यक्त करा