You are currently viewing एक राखी अशीही

एक राखी अशीही

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एक राखी अशीही*

 

एक राखी अशीही

अनाथ मुलांना बांधताना

त्यांच्या मुखावरच्या हर्षात

ममतेचे बंध सांधताना….१

 

एक राखी अशीही

अवयवदान करणाऱ्यांना

अंधारलेल्या आयुष्यात

आनंद पेरत जाणाऱ्यांना…..२

 

एक राखी अशीही

वृध्दाश्रमातल्या ज्येष्ठांना

त्यांचा आशीर्वाद घेऊन

आनंद देऊ या श्रेष्ठांना….३

 

एक राखी अशीही

बहीण बंदुकीला बांधताना

भाऊ शहीद झाला असता

त्याच्या स्मृतींना जपताना….४

 

एक राखी अशीही

बांधू वैज्ञानिकांच्या हातांना

जिद्द कष्ट परिश्रमाचे‌

अभिमान गीत गाताना…..५

 

एक राखी अशीही

भारतमातेला अर्पिताना

समता ऐक्य बंधुभाव

एकात्मता जपताना….६

 

**************************

©️®️ डॉ.सौ. मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा