You are currently viewing भगवा सप्ताह निमित्ताने शिवसेना महिला संघटिका सौ. सुकन्या नरसुले यांचा महिलांशी संवाद

भगवा सप्ताह निमित्ताने शिवसेना महिला संघटिका सौ. सुकन्या नरसुले यांचा महिलांशी संवाद

आमिषाला बळी पडू नका, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकास साधा

सावंतवाडी :

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या खात्यात पैसे जमा होतील, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरेलू कामगार यांची जशी फसवणूक झाली तशीच फसवणूक येत्या विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहे. महिलांनी आमिषाला बळी पडू नका, बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करा आणि आर्थिक विकास साधा, असे कळकळीचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या तथा उबाठाच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या महिला संघटिका सौ. सुकन्या नरसुले यांनी केले. लाडकी बहिण योजनेतून मिळणारे पैसे किती दिवस पुरतील? असा सवालही त्यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या भगवा सप्ताह चा प्रारंभ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कोलगाव या गावातून शुक्रवारी झाला. यावेळी महिलांची संवाद साधताना सौ. सुकन्या नरसुले बोलत होत्या.

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी तालुका संघटक मायकल डिसोजा, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ गावडे, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, प्रकाश गडेकर, अशोक परब, महिला संघटक भारती कासार, सुनील गावडे, बाळू गवस, नामदेव नाईक, बाळू माळकर, शैलेश टिळवे, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, सौ. करमळकर, विद्या राणे आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक विजयाचा संकल्प करूया, मंत्री दीपक केसरकर यांना धडा शिकविणार, असा इशारा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला. विधानसभा विजयाचा संकल्प करा असे आवाहन त्यांनी केले.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून भगवा सप्ताह घेऊन सावंतवाडी तालुक्यात शिवसेना संपर्क यात्रा सुरू करत आहोत, सर्वानी लोकसेवक म्हणून काम करा असे आवाहन त्यांनी केले.

तालुकाप्रमुख संजय गवस यांनी शिवसेना पक्ष सर्वसामान्यांचा कायम राहिला आहे त्यामुळे ही संपर्क यात्रा विजय यात्रा ठरावी यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन केले. माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गद्दारांना पाडण्यासाठी कामाला लागा असे आवाहन केले तर चंद्रकांत कासार यांनी पराभवाच्या भीतीने लाडकी बहीण योजना सुरू करण्याची नामुष्की सरकारवर आल्याची टीका केली.

प्रास्ताविक तालुका संघटक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मायकल डिसोजा यांनी केले. यावेळी शिवसैनिकांना काजू सुपारी रोपांचे वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा