*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विषय – स्वातंत्र्यदिन* 🇮🇳🇮🇳🇮🇳
हिंदु मुस्लिम शीख, ईसाई
धर्मियांचा देश महान
नांदती सगळे एकत्र येथे
त्याचा अम्हासी अभिमान
सुजलाम,सुफलाम सुंदरसा
राकट कणखर भूमीचा
जन्मभुमी ही आमची
संस्कार आम्हावर तिचा
गंगा, यमुना, सरस्वती
झरझर वाहती जोमाने
उपकार अम्हावरी तयांचा
प्रणाम करतो प्रेमाने
साधू संतांची भुमी ही
अनेक भाषा देशात
माय बहिणींची होते पुजा
कोणत्याही मग वेशात
किती वर्णावी थोरवी
माझ्या भारत देशाची
नांदतो येथे कष्टकरी
भाकरी त्याच्या कष्टाची
परदेशात सत्कार
माझ्या भारत देशाचा
गगनी झळके तिरंगा
असे तिरंगी रंगाचा
प्रवचन, कीर्तन, भारुडे
संतांची येथे गाती
माझ्या भारत देशाची
गाऊ किती मी महती
*शीला पाटील. चांदवड.*