You are currently viewing मनविसेच्या जिल्हाध्यक्षपदी सुधिर राऊळ यांची नियुक्ती

मनविसेच्या जिल्हाध्यक्षपदी सुधिर राऊळ यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुधीर राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले व कुडाळ या चार तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. सुधिर राऊळ यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन हे पद त्यांना देण्यात आले आहे. यापूर्वी मनविसे सावंतवाडी तालुकाअध्यक्ष म्हणून पक्ष वाढवण्यात त्याचा मोठा हातभार होता. त्याच्या कार्याची दखल मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी ह्या पदी सुधिर राऊळ यांना नियुक्त केले आहे. तर जिल्हासंपर्क अध्यक्ष म्हणून अमोल साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा