चौकुळ ग्रामस्थांच्या कबुलायतदार जमीन प्रश्नी साखळी उपोषणाला सुरुवात.
सावंतवाडी
चौकुळ ग्रामस्थांनी कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नी आज स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषण आणि साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. चौकुळ येथील कबुलायायदार गावकर जमीन ही मूळ कबुलायतदार गावकरांची होती हे सिद्ध झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा शासनाला अहवाल दिलेला आहे. १० मे १९९९ साली शासनाने काढलेले ज्ञापण महाराष्ट्र शासन परिपत्रक रद्द करावे.आणि २००० सालचे शुद्धीपत्रक रद्द करावे. पूर्वी प्रमाणे मूळ कबुलायतदार गावकर खात्यात जमीन गावाला पुन्हा प्रदान करावी. यासाठी आज स्वातंत्रदिनापासून चौकुळ ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.यात पाच ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत.तर बाकी गावातील सर्व ग्रामस्थ साखळी उपोषण करून पाठिंबा देणार आहेत. ग्रामदैवत सातेरी आणि भावई मंदिरात नारळ ठेवून मग उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ च्या सभागृहात उपोषण सुरुवात झाली आहे. पाच जन आमरण उपोषणाला बसले आहेत.यात दिनेश गावडे,आनंद गावडे,सुरेश गावडे,नारायण गावडे,धनंजय गावडे हे आमरण उपोषण तर पूर्ण गाव साखळी उपोषण करून पाठिंबा देण्यासाठी उपोषण करणार आहे. यावेळी सरपंचासह गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. आंबोली माजी सैनिक संघटना देखील पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.