You are currently viewing कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील यांना ब्रेन हॅमरेज

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील यांना ब्रेन हॅमरेज

कोल्हापुर येथे उपचार सुरू, प्रकृती स्थिर

कणकवली
​कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील हे ब्रेन हॅमरेज मुळे कोमात गेल्याने त्यांना कोल्हापूर येथील सिद्धांत हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांची पत्नी डॉ.पाटील यांनी दिली.

डॉ.पाटील कोल्हापूर- गडीग्लज येथे गावी गेले असता दोन दिवसांपूर्वी सकाळच्या व्यायामावेळीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी त्यांच्या सोबत त्याची पत्नी होती त्यांना डॉ.पाटील यांनी आपल्याला ब्रेन हॅमरेजचा स्ट्रोक येतो आहे याची कल्पना दिली होती. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सिद्धांत हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. वैद्यकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर पाटील यांचे ब्रेन हॅमरेज वर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 3 =