*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम देशभक्तीपर काव्य रचना*
*-स्मरण गीत-*
स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर रक्त शिंपले क्रांतीकारकांचे
सहजी न लाभले स्वातंत्र्य देशा बलिदान रणवीरांचे
विस्मृतीत गेले पूर्ण समर्पण अनाम त्या देशभक्तांचे
उचंबळते हृदय सन्मान कराया सच्च्या राष्ट्रप्रेमींचे
-१-
अंतरांमधून उठती उत्स्फूर्त कोटी जयहिंद चे नारे
विसरुनी दैन्य दुःख आपले संचारती चैतन्याचे वारे
-२-
शस्त्रसज्ज व्हा आव्हान काळाचे अस्तित्वाला राखावया जगी
अहिंसेचा मंत्र जरी आपला सामर्थ्याची मानावी बंदगी
-३-
निपटावा भ्रष्टाचार मुळात कलंक जो देशाला लागलेला
घरभेदींचे व्हावेत शिरच्छेद तात्काळ साक्ष पुराव्याला
-४-
नको जात, धर्म, वंशाचे, भाषांचे कलह वाढ भेद फुटीचे
घडावे दर्शन जगाला सदा देशाच्या अखंड एकजुटीचे
-५-
किडके निकृष्ट बियाणे रूजू नये कधी या भूमीत विषारी
संस्कृती अलग आपली जपावी तत्वे मूल्ये भारती
नुसारी
-६-
-बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
द्वारा डॉक्टर साई प्रसाद बाबू
अनिका पिकॅडिली
ए-५०३
पुनावळे, पुणे-४११०३३
मो. 9890567468