You are currently viewing का विरुनी धुक्यात गेले

का विरुनी धुक्यात गेले

*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*का विरुनी धुक्यात गेले*

 

आरशावरी आताशा

का धुके साचलेले

माझेच प्रतिबिंब मजला

का अनोळखी आज झाले

 

रस्ताही ओळखीचा

हरवुनी धुक्यात गेला

कलकलाट पाखरांचा

का शांत शांत झाला

 

चेहरेही ओळखीचे

हरवुनी धुक्यात गेले

माझेच लोक मजला

का विसरुनी आज गेले

 

शिरले धुक्यात मी की

धुक्यानेच वेढले मजला

हा खेळ लपाछपीचा

का सुरू अचानक झाला

 

चाहूल ना कशाची

मज काहीच उमजेना

भासात जगते मीही

का अस्तित्व गवसेना

 

घायाळ मन माझे

सैरभर आज झाले

प्रतिबिंब अनोळखी तेही

का विरुनी धुक्यात गेले

 

– अरुणा गर्जे

प्रतिक्रिया व्यक्त करा