*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित संत दर्शने काव्यमालेतील अप्रतिम काव्यरचना*
*संत बंका*
महेनपुरी जन्मले
उपेक्षित नि वंचित
अस्पृश्य क्षुद्र जातीत
गावकुसाबाहेर
-१-
संत निर्मळेचे पती
अभंग त्यांचे गहिरे
विठ्ठल रूप साजिरे
चाळीस अभंगांत
-२-
सुलभ नाम विठ्ठल
इथे नामाचा आधार
करी भवनदी पार
वंका विठू तल्लीन
-३-
चोखोबांना केले गुरू
सुख संतांच्या संगती
विठ्ठल स्तूती प्रशस्ती
कथितो संत वंका
-४-
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
द्वारा डॉक्टर साई प्रसाद बाबू
अनिका पिकॅडिली
ए-५०३
पुनावळे पुणे- ४११०३३
मो. 9890567468