सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जागृती ग्रामसंघ, माजगाव मासिक सभा दिनांक 5 जानेवारी 2020 वार मंगळवार रोजी पार पडली.
या सभेला ग्रामसंघातील समूहांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि सचिव उपस्थित होते. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्रीमती एम.एस.नाईक- अभय केंद्र सावंतवाडी, नीलम ताई शिंदे- पीस ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष, नंदकिशोर फोंडेकर – जिल्हा बाल संरक्षण कक्ष. सहकारी- प्रथमेश मोहन नाईक, श्वेता शामसुंदर बगळे यांचे महिलांना मार्गदर्शन लाभले. कौटुंबिक हिंसाचार, समस्या, महिला बालकल्याण समितीमध्ये असणारे अधिकार, बालसंगोपन योजना, दत्तक विधान, लैंगिक अत्याचार, व्यवसाय विषयक मार्गदर्शन अशाप्रकारे स्त्री हक्क मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्राम संघाच्या सचिव ताई सपना गावडे, अध्यक्ष चेतना सावंत सहकारी व ICRP श्रीया सावंत यांनी केले. ‘उमेद’ अभियाना मधील दहाव्या सूत्रानुसार शाश्वत उपजीविका असणाऱ्या महिलांना एक-एक गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गाव दारिद्र्य निर्मूलन आराखडा याची माहिती समूहातील महिलांना देण्यात आली. अशीच उपस्थिती कायम राहण्यासाठी सूचना देऊन, समस्या जाणून घेऊन सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती ग्राम संघाचे आयसीआरपी सौ.श्रीया श्रीकृष्ण सावंत यांनी केले.