You are currently viewing उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा ई कवी संमेलनाचे आयोजन

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा ई कवी संमेलनाचे आयोजन

जळगाव:

दि.११ आगस्ट रोजी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन ची झूम मीटिंग संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी आली सर्वप्रथम फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव गणेश कोळी यांनी प्रास्ताविक करून सर्वांसमोर विषय मांडले. त्यानंतर डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी विविध विषयावर सविस्तर सर्वांशी चर्चा केली.

दिनांक १८ऑगस्ट व २५ ऑगस्टला शिव श्रावण धारा ई कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येईल असे ठरले असून, दिनांक १८ ऑगस्टच्या शिव श्रावण धारा ई कवी संमेलनाचे अध्यक्ष फाउंडेशनचे कार्यकारणी सचिव मुक्ताईनगर येथील कवी प्रमोद पिवटे असतील. तर दिनांक २५ ऑगस्ट रोजी शिव श्रावण धरा ई कवी संमेलनाचे अध्यक्ष फाउंडेशनचे राज्य सहसचिव अकोला येथील डॉ. अशोक शिरसाट यांची निवड डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी या प्रसंगी जाहीर केली. त्याचप्रमाणे उज्जैनकर फाउंडेशनचा १५ वा वर्धापन दिन दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रविवारला आयोजित करण्यात येईल त्याप्रसंगी शिव श्रावण धारा ई कवी संमेलनामध्ये सहभागी सर्व मान्यवर कवी व पदाधिकाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. असे याप्रसंगी जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे आळंदी येथील तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाच्या विशेषशंका विषयी व संपादक मंडळ विषयी चर्चा करणे आली. त्यानंतर जळगाव जिल्हा कार्यकारणी मध्ये चाळीसगाव येथील कवी गणेश निकम यांची जळगाव जिल्हा संघटक पदी तर वरणगाव येथील कवयित्री सौ. सुवर्णा तायडे यांची जळगाव जिल्हा महिला संघटक पदी जळगाव जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील यांनी ही निवड जाहीर केली तर उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष श्रीमती ज्योतीताई राणे यांनी अनुमोदन देऊन त्यांचे अभिनंदन केले याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी या नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. प्रसंगी फाउंडेशनचे राज्य सहसचिव अकोला येथील डॉ.अशोक शिरसाठ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार आणि शंकरराव अनासुने बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री बाळूभाऊ ईटणारे बुलढाणा जिल्हा सचिव प्रदीप मोरे सर जळगाव जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील सर छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख एडवोकेट सर्जेराव साळवे उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष श्रीमती ज्योतीताई राणे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव रामचंद्र गुरव धुळे जिल्हा अध्यक्ष अश्विन अमृतकर आदी उपस्थित सर्व पदाधिका ऱ्यांनी शंका समाधान व सूचना या सदरात आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कवी गणेश निकम व कवयित्री सुवर्णाताई तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव गणेश कोळी यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा