You are currently viewing सत्यवान रेडकर (अनुवाद अधिकारी सीमाशुल्क मुंबई) करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांसाठी निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

सत्यवान रेडकर (अनुवाद अधिकारी सीमाशुल्क मुंबई) करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांसाठी निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

*”तिमिरातुनी तेजाकडे” अंतर्गत शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला येथे दोन सत्रात व १७ ऑगस्ट रोजी कुडाळ येथे तीन सत्रात होणार व्याख्यान*

 

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले दहावी बारावी बोर्डात येतात एवढेच नव्हे तर कोकण बोर्ड राज्यात अव्वल असतं परंतु जेव्हा जिल्ह्यातील मुले पुढे जाऊन स्थानिक सरकारी अधिकारी बनतात का..? असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा मात्र उत्तर काहीसं निराश करणारं असतं. जिल्ह्यातील मुले शालांत परीक्षेत अव्वल असतात मग पुढे जाऊन ती स्पर्धा परीक्षांमध्ये का मागे पडतात? हा प्रश्न जरा सतावणारा असला तरी त्याचं उत्तर एकच की, मुलांना उत्तम मार्गदर्शन मिळत नाही.. केवळ पुस्तकी ज्ञान, भोकमपट्टी करून बोर्डात येता येईल पण जर चाकोरी बाहेरील यश मिळवायचे असेल, स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हायचे असेल तर अतिरिक्त ज्ञान, वाचन केले पाहिजे. परंतु काय वाचायचे, परीक्षा कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित असतात, त्यासाठी कशी तयारी करायची आणि कोणते ज्ञान आत्मसात करायचे हे ज्ञात होण्यासाठी उत्तम मार्गदर्शकाची गरज असते. कोकणातील मुलांची हीच गरज ओळखून मुलांना अधिकारी बनविण्याचे ध्येय घेऊन भारत सरकारच्या सीमाशुल्क विभागात अनुवाद अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री.सत्यवान रेडकर हे निःशुल्क मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने देत आहेत. जिल्ह्यातील मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

श्री.सत्यवान रेडकर हे शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी वेंगुर्ला येथे दोन सत्रात व शनिवार, १७ ऑगस्ट २०२४ रोजी कुडाळ येथे तीन सत्रात (२८७-२९१)वे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान देणार आहेत.

शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४

सकाळी ८.०० वाजता, बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

सकाळी १०.०० वाजता, रामचंद्र कृष्णाजी पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे कनिष्ठ महाविद्यालय, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

शनिवार, १७ ऑगस्ट २०२४

सकाळी ८.०० वाजता (शालेय विद्यार्थ्यांसाठी) व दुपारी १.३० वाजता (महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी), क.म.शि.प्र मंडळाचे कुडाळ हायस्कुल ज्युनिअर कॉलेज, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

सकाळी ११.०० वाजता, जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

जास्तीत जास्त व्यक्तींनी मार्गदर्शन व्याख्यानाचा लाभ घ्यावा व आपल्या संपर्कातील लोकांना, व्हाट्सअप समुहांमध्ये प्रसिद्धी द्यावी असे आवाहन आयोजक व व्याख्याते श्री.सत्यवान रेडकर यांनी केले आहे.

श्री. रेडकर हे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करतात, कोणतेही मानधन घेत नाहीत, विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन नेहमीच निःशुल्क. राज्य शासनासाठी मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी कमाल मर्यादा 43, खुल्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी कमाल वयोमर्यादा 38 त्यामुळे सदर मार्गदर्शन हे सर्व जाती-धर्मातील व्यक्तींसाठी असते. कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नसते.

आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना रोजगाराच्या अनुषंगाने संधीचा लाभ घेता यावा व जास्तीत जास्त महाराष्ट्रातील व्यक्तींचे विविध पदांवर निवड होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे, आपल्या नातेवाईकांना किंवा आप्तेष्टांना स्वतःहून घेऊन यावे अथवा त्यांना उपस्थित राहण्यास प्रवृत्त करावे. जास्तीत जास्त व्हाट्सअप समूहांना प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करावे.

शनिवार/रविवार सुट्टीचा दिवस असला तरी श्री.रेडकर डोंबिवली वरून निशुल्क मार्गदर्शन करण्यासाठी येतात तर आपण स्वतःच्या/इतरांच्या भविष्यासाठी वेळ काढून का येऊ शकत नाही? पाऊस होता, वेळ नव्हता, घरी पाहुणे आले होते, खाजगी क्लास होता, लांब आहे, घरचा कार्यक्रम होता ही आपली वैयक्तिक कारणे. ज्यांना भविष्याविषयी चिंता आहे त्या पालक आणि विद्यार्थ्यांनी वेळ काढून उपस्थित रहावे.

संपर्कासाठी नंबर..

सत्यवान यशवंत रेडकर

मो. 9969657820

अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार

SSC JHT EXAM, AIR 166

संस्थापक, तिमिरातुनी तेजाकडे

प्रतिक्रिया व्यक्त करा