*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“पृथ्वीचे संगीत”*
निसर्ग आहे सदाबहार शाश्वत
पृथ्वीचे ऐकूया लय संगीत गायनIIधृII
नैसर्गिक नाते असते घनिष्ठ गहन
भूमीतून सखोल अस्तित्वाची होते जाण
पंचमहाभूते सांभळती पर्यावरणII1II
पानांची सळसळ झऱ्यांचा खळखळाट
रातकिड्यांची किरकिर पक्षांचे गुंजन
पर्जन्य बरसात ऐकावे सप्त नादII2II
भूमाता नित्य घाली मायेच पांघरूणं
आळवे अंगाई गीत करी निद्रा प्रदान
फिरवे तनुवर हात क्षमा करूनII3II
सजीवाला देते अन्न करिते पोषण
नैसर्गिक क्रियांचे भार करिते सहन
कला संगीत शक्ती अर्पिते राहू कृतज्ञII4II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.