You are currently viewing रामगड कुंभारवाडी येथील युवकाचा मृतदेह सापडला

रामगड कुंभारवाडी येथील युवकाचा मृतदेह सापडला

रामगड कुंभारवाडी येथील युवकाचा मृतदेह सापडला

शनिवारी सकाळी रामगड ग्रामस्थांना नदीपात्रात आला आढळून

आचरा :

रामगड कुंभारवाडी येथील गळाने मासे पकडण्यासाठी गुरुवारी दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास गेलेला युवक राहूल कृष्णा जिकमडे याचा मृतदेह तिस-या दिवशी शनिवारी सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास घटनास्थळा पासून सुमारे पाचशे मिटर अंतरावर खडकाची कोंड येथे ग्रामस्थांच्या शोध मोहिमेत आढळून आला.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहूलला गळाने मासे पकडण्याचा छंद होता. तो स्वतः मासे खात नव्हता.अतिशय हुशार म्हणून राहूल ओळखला जात होता. बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंट साठी कणकवली येथे त्याने प्रवेश घेतला होता. सात वर्षापूर्वीच वडीलांचे छत्र हरपल्याने त्याच्या आईने कष्टाने त्यांना सांभाळले होते. उशिरापर्यंत तो मासेमारीसाठी थांबत असल्याने गुरुवारी सायंकाळी तो आला नाही म्हणून राहूलच्या आईने आणि बहिणीने त्याचा शोध घेतला होता. पण तो आढळून आला नसल्यामुळे हि बाब ग्रामस्थांना कळल्यावर शोध मोहीम राबवली गेली.गुरुवारी न सापडल्याने शुक्रवारी सकाळी शोधाशोध केली पण शुक्रवार सकाळपर्यंत तो आढळून आला नसल्यामुळे याची खबर प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर एनडीआरएफ टीमला पाचारण करून त्यांच्याकडून साधारण अडीज किलोमिटर परीसरात शोधाशोध केली गेली .पण प्रयत्न व्यर्थ ठरले. शुक्रवारी सायंकाळी मालवण येथील स्कूबा ला पाचारण करुन बेळणे नदी खाडी पात्रात शोध मोहीम राबवली गेली.शुक्रवारी घटनास्थळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार आचरा मंडल अधिकारी अजय परब, पोलीस कर्मचारी बबन पडवळ ,तांबे मनोज पुजारे, रामगड तलाठी यू एम वजराटकर ठाण मांडून होते.तिस-या दिवशी शनिवारी सकाळी रामगड सरपंच शुभम मठकर, पो.पा नारायण जिकमडे ,सुरेंद्र जिकमडे,अविनाश सादये,विष्णू कोळबकर.सुमेश सादये महेश पारकर.बंटी जाधव आदी ग्रामस्थांनी जेथे राहूल मासे पकडण्यासाठी गेला होता त्या भागात शोध मोहीम सुरू केली .साधारण दहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळा पासून अंदाजे पाचशे मिटर अंतरावर खडकाची कोंड येथे ग्रामस्थांना राहूल जिकमडे याचा मृतदेह आढळून आला.राहूलच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण रामगड गावावर शोककळा पसरली आहे.त्याच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा