अल्पवयीन मुलीचे अपहरण, युवकाला दोन दिवस पोलिस कोठडी…
बांदा
तालुक्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून अत्याचार केल्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या महादेव उर्फ मंदार दत्ताराम परब (रा.मडुरा-रेडकरवाडी) याला आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. अत्याचारग्रस्त विद्यार्थिनी शाळेत जात असताना तिचे अपहरण केले होते. तिच्यावर दोन दिवस अत्याचार झाल्याचे तपासात व वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आज त्याला दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली