You are currently viewing कणकवली, देवगड, वैभववाडी भाजप मंडल अध्यक्षांची निवड

कणकवली, देवगड, वैभववाडी भाजप मंडल अध्यक्षांची निवड

कणकवली, देवगड, वैभववाडी भाजप मंडल अध्यक्षांची निवड

कणकवली शहर मिलिंद मेस्त्री तर ग्रामीन मधून दिलीप तळेकर

देवगड राजेंद्र शेट्ये,तर पडेल मंडल मधून बंड्या नारकर

वैभववाडी मंडळ अध्यक्षपदी सुधीर नकाशे यांची निवड

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली नियुक्ती,आमदार नितेश राणे यांनी केले अभिनंदन

कणकवली

कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या शहर मंडल अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री यांची तर ग्रामीण मंडल अध्यक्षपदी माजी सभापती दिलीप तळेकर यांची निवड करण्यात आली. देवगड तालुक्यातील देवगड मंडळ अध्यक्षपदी राजेंद्र शेट्ये तर पडेल मंडळ अध्यक्षपदी महेश उर्फ बंड्या नारकर यांची निवड करण्यात आली तर वैभववाडी मंडळ अध्यक्षपदी सुधीर नकाशे यांची निवड करण्यात आली आहे.आज ओरोस येथे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यानी ही निवड जाहीर केली.

निवडीनंतर नुतन तालुकाध्यक्षांचे पुच्छगुच्छ देवून भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आम .नितेश राणे यांनी अभिनंदन केले. ओरस येथील भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात या निवडी जाहिर करण्यात आल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार अजित गोगटे, भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत, बाळ खडपे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, सरचिटणीस महेश गुरव, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप सावंत, राजु हिर्लेकर, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, प्रज्वल वर्दम, पंढरी वायंगणकर, सुभाष मालंडकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कणकवली तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री व दिलीप तळेकर यांची निवड झाल्याबद्दल तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा