बांदा :
बांदा येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने उद्या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. या मंडळाचे रक्तदान शिबिराचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. दरवर्षी या शिबिरात सर्व कार्यकर्ते, व्यापारी, ग्रामस्थ, महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी होतात. यावेळी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आवाहन मंडळाच्या वतीने अध्यक्ष अनय स्वार, उपाध्यक्ष आबा धारगळकर व शिबिर प्रमुख अक्षय मयेकर यांनी केले आहे.