ओढ्यात बुडालेल्या युवकाच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत
वेंगुर्ले
ओढ्यातील पुरात वाहून मृत्यू झालेल्या मठ-आईरवाडी येथील रावजी आईर या युवकाच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून प्राप्त झालेला चार लाखाचा धनादेश वेंगुर्ले तहसीलदारांनी रावजी यांच्या आईच्या बँक खात्यात जमा केला.
सदर जमा केलेल्या रकमेचे पत्र स्वतः तहसीलदार ओंकार ओतारी यांनी गुरुवारी आईर कुटुंबाच्या घरी जाऊन सुपुर्द केले. या प्रसंगी मठ तलाठी दिनेश गाभुड व मठ कोतवाल सुरेश मठकर उपस्थित होते. मठ-आईरवाडी येथील रावजी सीताराम आईर (२२) हा युवक २७ जुलै रोजी ओढ्यातून रोजंदारीच्या कामास जात असताना वाहून गेल्याने मृत्युमुखी पडला होता.