*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य जेष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
नागपंचमी
श्रावणाची रिमझिम
नागपंचमीचा दिन आला
पुजू नागोबाला
भाऊरूपी।।
गंधपुष्प धूपदीप
वारुळाला चला जाऊ
नागोबाला वाहू
दूधलाह्या।।
मनातला भक्तीभाव
कटिबद्ध नाग रक्षणास
राखतो धान्यास
उंदरापासून।।
उगाच नाही
कोणाला दंश करत
जीवाला सांभाळत
राहतो।।
अंधश्रद्धा नसावी
उपकार त्याचे मानावे
नागपंचमीला पुजावे
ऋणातून।।🐍
०००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार@✍️