*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य जेष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नागपंचमी*🐍
पंचमीचा सण आला
चला बाई माहेराला
आला भाऊ न्यावयाला
बैलगाडी बसायला
पहिलवान माझा भाऊ
याला गं काय मागु
आयुष्य त्याला राहो
हेचं देवाजीला सांगु
बैलगाडी खुळू खुळु
सर्जा राजा संगतीला
बारा बिग्याची जमीन
माझ्या भावाच्या जोडीला
रानामध्ये जाऊ चला
नागोबाला पुजायला
वारुळाची करु पुजा
दुध लाह्या नैवेद्याला
झोका बांधु डहाळीला
भिडे उंच आभाळाला
गाऊ नाचु होऊ दंग
गाणी गात नागोबाला
माहेरच्या अंगणात
जमल्यात साऱ्याजणी
हितगुज करूयात
एकमेकी कानोकानी
सण नाग पंचमीचा
आला आनंद घेऊनी
एकमेकां टाळी देऊ
जमल्यात साऱ्याजणी
*शीला पाटील. चांदवड.*