दुर्गम भेकुर्ली जि. प. शाळेला मंत्री केसरकर यांच्याकडून मदत*
*दोडामार्ग,
तालुक्यातील भेकुर्ली हा गाव दुर्गम असून येथील जि. प. शाळेला भौतिक सुविधा उपलब्धतेसाठी शालेय आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची आर्थिक मदत दिली.
यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांसह रामदास मेस्त्री, दादा देसाई, योगेश महाले, गोपाळ गवस, संदीप गवस, भगवान गवस, गुरूदास सावंत आदी उपस्थित होते.
भेकुर्ली ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांची भेट घेतली होती यामध्ये शाळेच्या भौतिक सुविधासाठी आर्थिक मदत देण्याची विनंती केली होती ही बाब श्री. गवस यांनी सदर बाब मंत्री केसरकर यांच्या कानी घातली त्यानंतर दोडामार्ग येथे मंत्री केसरकर गुरुवारी आले असता त्यांनी तातडीची मदत दिली ही मदत श्री. गवस यांनी ग्रामस्थांकडे सुपूर्द केली.