*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”आला श्रावण”*
श्रावण आला आनंदाला येई उधाण
सृष्टी टाकी कात प्रसन्न वातावरण।।धृ।।
श्रावण सरी करती अभिषेक वरून
सृष्टी हिरवा शालू करिते परिधान
डोंगर स्वच्छ होती उन्हांत न्हाऊन।।1।।
दाट धुकेच देई उन्हास आलिंगन
आल्हाद वाटे प्रेम रंगांची पखरण
निसर्ग रेखितो मुक्त हस्ते चित्रांगण।।2।।
श्रावण खट्याळ दावी कधी पाऊस-ऊन
संगीत मेघमल्हार वाजवीत बिन
कविंना खुणावे इंद्रधनू नभांतून।।3।।
श्रावणी पशुपक्षी नाचती आनंदानं
सुमन गंध निसर्ग करी उधळण
दृश्य विलोभनीय तृप्त होती नयन।।4।।
सणांचा मास सृष्टी देवतांचे पूजन
भक्ति भाव संगम रास खेळे राधा-कृष्ण
ईश्वरा स्वास्थ्य मिळो सदा राहूदे श्रावण।।5।।
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.