देवगड :
देवगड तालुक्यातील वानिवडे गावच्या सरपंच सुयोगी घाडी यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण राज्य सरकारकडून मिळाले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सरपंच आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देवगड तालुक्यातील वानिवडे गावच्या सरपंच सुयोगी घाडी यांना भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने १५ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाकडून आवश्यक सूचना त्यांना देण्यात आले आहेत.