You are currently viewing निवणुकीच्या ऐन रणधुमाळीत भाजपचा शिवसेनेला जोरदार धक्का

निवणुकीच्या ऐन रणधुमाळीत भाजपचा शिवसेनेला जोरदार धक्का

इन्सुली शिवसेना शाखा प्रमुख सहदेव सावंत सह अनेक शिवसैनिक भाजपवासी

सावंतवाडी

ग्रामपंचायत निवडणुकांची ऐन रणधुमाळी सुरु असतानाच इन्सुली गावात शिवसेनेला भाजपने जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे युवा नेते आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत इन्सुली शिवसेना शाखाप्रमुख सहदेव सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान पेडणेकर, उद्योजक नंदू नाईक, नागेश सावंत, झिलू सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिकांचा समावेश आहे. या प्रवेशावेळी सावंतवाडी सभापती मानसी धुरी, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, विजय गावकर, तात्या वेंगुर्लेकर, महेश धुरी, प्रताप सावंत, निगुडेचे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, बूथ अध्यक्ष अमेय कोठावळे, अजय सावंत, अभय आजगांवकर, महिला शक्ती केंद्रप्रमुख सुचित्रा शिंदे आदी उपस्थित होते. या प्रवेशामुळे इन्सुली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसणार असून लवकरच आणखीही काहीजण भाजपात प्रवेश करणार असल्याचे यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − two =