नेरूर येथे ७ ऑगस्टला मोफत आरोग्य शिबीर…
कुडाळ :
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गरोदर व प्रस्तुत मातांसाठी नेरूर येथे बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर, बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ०१ वाजेपर्यंत आरोग्यम येथे (जुने इंगेश हॉस्पिटल) हे आरोग्य शिबीर होणार आहे.
या शिबिरामध्ये गरोदर मातांची तपासणी, गरोदर मातांची रक्त तपासणी, गरोदर मातांचा आहार व प्रसूतीपूर्व व्यायाम यांची माहिती व स्तनपान विषयक माहिती पुस्तिका यांचे वाटपही करण्यात येणार आहे. तसेच शिबिरामध्ये अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग डॉ. संदेश कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, स्त्रीरोग तज्ञ व प्रसुतीतज्ञ, व कन्सल्टंट डॉ. गायत्री पालयेकर, बीएचएमएस व आहार तज्ञ डॉ. गार्गी ओरोसकर हे विशेष मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत.
शिबिराचे उदघाटन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, प्राचार्य कल्पना भंडारी, प्रा. वैशाली ओटवणेकर,व वरील डॉक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.
तरी गरजू महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिर संयोजक प्राचार्य कल्पना भंडारी, प्रा. वैशाली ओटवणेकर, विभाग प्रमुख प्रा. सुमन करंगळे, प्रा. वैजयंती नर, यानी केले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधण्यात यावा -, ७५१७२१७०६३, 75 17 21 70 63, ७०५८९०८३०६.
WhatsApp Facebook