वेंगुर्ला :
सिंधुदुर्ग विमानतळ -चिपी तालुका वेंगुर्ला येथे दिनांक ०३ ऑगस्ट २०२४ रोजी चिपी विमानतळ प्राधिकरण, वनविभाग सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधुदुर्ग विमानतळ” कार्यरत फिल्ड स्टाफ यांना वन्यप्राणी यांची ओळख, त्यांचा अधिवास, याबाबत आयोजित चर्चासत्रात मुख्य अतिथी म्हणून मानद वन्यजीव रक्षक, वनविभाग सावंतवाडी प्राध्यापक श्री.नागेश दप्तरदार सर, वनक्षेत्रपाल कुडाळ श्री.संदीप कुंभार, विमानतळ व्यवस्थापक श्री.कुलदीप सिंग, वनपाल मठ सावळा कांबळे, वनरक्षक मठ सुर्यकांत सावंत, वनरक्षक तुळस विष्णू नरळे उपस्थित होते.
व्यवस्थापक श्री.कुलदीप सिंग यांनी मान्यवराचे स्वागत करून प्रास्ताविक केले. तदनंतर श्री.मनु श्रीवास्तव यांनी “सिंधुदुर्ग विमानतळ” परिसरात आढळणाऱ्या पक्षी, प्राणी व सरपटणारे प्राणी यांची माहिती देवून प्रत्येक महिनाप्रमाणे डेटा सादर केला. त्यानंतर श्री. नागेश दप्तरदार सर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळनाऱ्या पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी यांची चित्रफित दाखवून उपस्थित फिल्ड कर्मचारी अधिकारी यांना माहिती दिली. विमानतळ परिसरात आढळणारे कोल्हा, माकड, सरपटणारे प्राणी यांचा अधिवास, त्यांचे अन्नसाखळीतील महत्व विषद केले. त्याचबरोबर सदर प्राण्याकडून विमानतळ धावपट्टीवर येण्यापासून रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सांगितल्या.
वनक्षेत्रपाल कुडाळ श्री.संदीप कुंभार यांनी वन्यप्राणी यांना कायदाद्वारे असलेले संरक्षण व वन्य प्राणी- मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग करत असलेल्या उपाययोजना बाबत माहिती देवून कार्यरत रेस्कू पथकामार्फत होत असलेल्या रेस्कू ऑपरेशन बाबत माहिती दिली.