You are currently viewing कोकण जिंकायचय, गट-तट बाजूला ठेवून कामाला लागा – नारायण राणे

कोकण जिंकायचय, गट-तट बाजूला ठेवून कामाला लागा – नारायण राणे

कोकण जिंकायचय, गट-तट बाजूला ठेवून कामाला लागा – नारायण राणे

इच्छुकांना शुभेच्छा, पक्ष देईल तोच उमेदवार असल्याचे सुचक विधान…

सावंतवाडी

आगामी विधानसभेत महाराष्ट्रासह कोकण जिंकायच आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद, गट-तट बाजूला ठेवून पक्ष देईल त्या उमेदवाराल निवडून आणण्यासाठी जोरदार तयारीला लागा, तुम्ही पक्षाला काही तरी दिलात तर नक्कीच पक्ष तुम्हाला परतफेड करेल. त्यामुळे आता थांबू नका, इच्छुकांना माझ्या शुभेच्छा, असे आवाहन आज येथे आयोजित भाजपाच्या विस्तारीत अधिवेधनात खासदार नारायण राणे यांनी केले. दरम्यान आपण संयमी राहिलो तर त्यांचा फायदा अनेक जण उठविणार आहेत. त्यामुळे नेत्यांच्या विरोधात बोलणार्‍यांचा निषेध करा आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. जिल्ह्यात ठाकरे शिवसेना राहता नये यासाठी काम करा, अशी ही हाक त्यांनी यावेळी दिली.
भाजपाच्या माध्यमातून आज येथे आयोजित अधिवेशनात श्री. राणे बोलत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत राणे आणि त्यांना निवडून आणणार्‍या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला आहे. यावेळी श्री. राणे पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मला मताधिक्याने मी निवडून आलो, हा विजय म्हणजे तुम्ही कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती आहे, असे म्हणावे लागणार आहे तर माझ्या विजयात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी निश्चितच पुर्ण करणार आहे, असे सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतूक केले तसेच ते ३ वेळा पंतप्रधान झाले याचा मला सार्थ अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेेळी राणे पुढे म्हणाले, येणार्‍या विधानसभा निवडणुकीत आपल्याला महाराष्ट्रासह कोकण जिंकायचा आहे. त्या दृष्टीने येथील मतदारांनी काम करावे, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी साद घालत काही झाले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेना राहता नये यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगून भाजप नेत्यांच्या विरोधात बोलणार्‍यांना सोडू नका. त्यांचा तात्काळ निषेध करा, असे सागून मी आता जरांगे पाटील यांना प्रत्यूत्तर देण्यासाठी मराठवाड्याच्या दौर्‍यावर जाणार आहे. त्याच बरोबर उध्दव ठाकरेंना सुध्दा योग्य ते प्रत्युत्तर देणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, श्वेता कोरगावकर, युवराज लखमराजे भोसले, महेश सारंग, दादा साईल, रणजित देसाई, विशाल परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा