पुणे येथील तिघे दरोडेखोर आंबोलीत शस्त्रासह जेरबंद…
दोन बंदुकासह काडतूसे जप्त ; पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार…
आंबोली
पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पलायन केलेल्या तिघा संशयितांना आंबोली पोलिसांनी येथील चेकपोस्टवर शस्त्रासह ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन शस्त्र व काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. आपण पकडले जाऊ नये यासाठी त्यांनी पकड मोहीम राबवणा-या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही त्यांना पकडण्यात यश आले. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली. याबाबत पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी दुजोरा दिला आहे. त्यांना घेऊन पोलीस सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. ही कारवाई अभिजीत कांबळे, दीपक शिंदे व दत्तात्रय देसाई यांनी केली.
पुणे हिंजवडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स वर दरोडा टाकून गोव्याच्या दिशेने पळून जाणाऱ्या तिघां दरोडेखोरांना आंबोली येथील पोलिस दुरक्षेत्रावर सिनेमा स्टाईल पकडण्यात आले दुरक्षत्रावरील पोलिसांनी अचानक कार थांबल्यानंतर दरोडेखोरांकडून कारच दुरक्षत्रावरील पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी जीवावर उदार होत या दरोडेखोरांना पकडले असून त्याच्याकडून दोन बंदुका सह जिवंत काडतूसे सोन्या चांदीचा ऐवज जप्त केला आहे
घटनेनंतर आरोपींना सावंतवाडीत आणण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी सावंतवाडीत दाखल झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी पिंपरी हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील सराफी दुकानात भरदिवसा पाच चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. दुकान मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली तसेच मिळतील ते दागिने चोरट्यांनी घेऊन पोबारा केला होता या घटनेची नोंद हिंजवडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आल्यानंतर पिंपरी चिंचवड तसेच हिंजवडी पोलिस आरोपीचा पाठलाग करत होते.या पाठलागा नंतर या दरोडेखोरांनी गोवा गाठण्याचे ठरवले त्या प्रमाणे शनिवारी गोव्याकडे जात असतना दुपारी आंबोली येथील पोलिस दुरक्षेत्रावर आले असता आंबोली पोलीस दुरक्षत्रावरील पोलिसांनी त्याची कार थांबवली त्यावेळी या दरोडेखोरांनी कार पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई आबा पिळणकर दिपक शिंदे अभिजीत कांबळे यांनी स्वताच्या जीवावर उदार होत या दरोडेखोरांना कार सह जागेवर अडवून धरत तेथेच त्यांना पकडले.
यात तिघा आरोपीचा समावेश असून अल्ताफ बाबू खान (24) गोविंद भवरालाल दिवाणी (23) रातुराम कृष्णराम बिष्णोई (26) अशी त्यांची नावे आहेत.या सर्व आरोपींना सावंतवाडीत आणण्यात आले असून त्यांची कारसह झाडाझडती घेतली असता या झाडाझडतीत दोन बंदुका सह जिवंत काडतुसे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी सावंतवाडीत दाखल झाले असून आरोपीची कसून चौकशी करीत आहेत.अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आंबोली दुरक्षत्रावरील पोलिसांचे कौतुकास्पद काम
या दरोडेखोरांची कार आंबोली मार्गे गोव्यात जात असतनाच ही कार आंबोली दुरक्षेत्रावर थांबवली असता दरोडेखोर चांगलेच बिथरले आणि कार पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी वेळीच सावध होत या दरोडेखोरांना पकडले.त्यामुळेच पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.