You are currently viewing नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहे

नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहे

*नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहे…*

*भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संत श्री नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळ्याचा सावंतवाडीत आरंभ*

श्री संत नामदेव समाज उन्नती मंडळ सावंतवाडी यांच्या आयोजनातून सावंतवाडीच्या श्री विठ्ठल मंदिरात आज संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या भव्य संजीवन समाधी सोहळ्याचा आरंभ करण्यात आला. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.श्री संत नामदेव समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने भक्त मंडळींच्या आशीर्वादासह यावेळी श्री विशाल परब यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडातील वारकरी संप्रदायाचे प्रचारक, नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होते. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारे संत अशी त्यांची कीर्ती होती. महाराष्ट्रापासून ते थेट पंजाबपर्यंत धर्मपताका फडकत ठेवणाऱ्या या महान संतांचे कार्य आजही महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे. आजच्या या सोहळ्यानिमित्त नामदेवांच्या “नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहे,मन पायीं राहे ऐसें कीजे” या अभंगातील मागणे मी त्यांच्याकडे मागतो, असे मनोगत श्री विशाल परब यांनी या संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त केले आहे.

श्री विठ्ठल रखुमाई मूर्तीची महापूजा, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती, कीर्तन, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद, भावगीत व भक्ती गीतांचे सादरीकरण आदी कार्यक्रमांसह हा समाधी सोहळा आज सावंतवाडी विठ्ठल मंदिरात संपन्न झाला. यावेळी ॲड. अनील निरवडेकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, अमित गवंडळकर, केतन आजगांवकर, गणेश पडते, संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष प्रसाद वर्णे, दिनेश कुबडे, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, दुर्गादास भांबुरे, राजन हावळ, रितेश हावळ, मंदार कल्याणकर, श्रीराम माळवदे, संदेश शंकरदास, सुनील भांबुरे, कुशल वेल्हाळ, परेश मुद्राळे, राजेश माळवदे, प्रमोद खटावकर, संजय मुद्राळे, मुन्ना मुद्राळे, निलेश कुबडे, विशाल कुबडे, बाळा शंकरदास, प्रसाद ढवळे, दादा ढवळे, ओमकार ढवळे, अजय ढवळे, मानकर सर, विवेक हिरवे, संजय हिरवे, अथर्व कुबडे, नंदू कल्याणकर, शिवराम कुबडे, उमेश कुबडे, जया कल्याणकर, दत्ता कल्याणकर, महेंद्र शंकरदास, समीर कुबडे, सचीन कुबडे, राजा खटावकर, नितीन उरणकर, संजय डंबे, सुजन मुद्राळे, देविदास माळवदे, महेश कल्याणकर, विजय मुद्राळे, महादेव मुद्राळे, धनंजय भांबुरे, राजेंद्र कुबडे, गितेश कुबडे, राजन कल्याणकर, चंद्रशेखर कुबडे, शशांक कुबडे, गुरू कल्याणकर, सागर कुबडे, जयप्रकाश कुबडे तसेच या सर्वांचे कुटुंबीय उपस्थित होते.

____________________________
*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू !! प्रवेश सुरू !!!*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)

*दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे..*

*📍पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा*📍

*(नॅक) मानांकन प्राप्त*

*📘 आमचे कोर्सेस*

▪️ B.Com (Regular)
▪️ B.Com (Bankaing & Insurance)
▪️ B.Sc (Information Technology)
▪️ B.Sc (Computer Science)

*📕 आमची वैशिष्ट्ये*

स्वतंत्र कॉलेज इमारत, सर्व सोयीनीयुक्त हवेशीर क्लासरुम, अद्ययावत इमारती, निसर्गरम्य परिसर

🔹 अभ्यासिकेसह सुसज्ज ग्रंथालय : सिध्दीविनायक पुस्तकपेढी सुविधा
🔹 अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक : अध्यापनात LCD प्रोजेक्टरचा वापर
🔹 इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक लॅब : प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी मोफत
🔹 संगणक साक्षरता कोर्स.
🔹 व्यक्तिमत्व विकास व व्यावसायिक शिक्षणाची सोय.
🔹 ३००+ विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध
🔹 मुलींसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह.
🔹 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज उपहारगृह/कॅन्टीन
🔹 विविध खेळांसाठी प्रशस्त क्रिडांगण व इनडोअर गेम्सची सुविधा. जिमखाना हॉल उपलब्ध
🔹 विविध विषयांवरील व्याख्याने व सेमिनार्सचे आयोजन.
🔹 सर्व सोयीनीयुक्त कॉन्फरन्स रुम व सेमिनार हॉल उपलब्ध.
🔹 नोकरीसाठी मार्गदर्शन वर्ग, प्लेसमेंट सेलची व कॅम्पस इंटरव्ह्यु सुविधा.
🔹 मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र कॉमनरुम व स्वच्छता गृहे
🔹 प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक समिती
🔹 विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वैयक्तिक लक्ष
🔹 शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्यांचा वेळेत लाभ.
🔹 फी भरण्यासाठी तीन हप्त्यांची सुविधा
🔹 प्रथम वर्ष प्रवेशितांसाठी ५० % सवलतीत बस पासची सुविधा
🔹 मुंबई विद्यापीठ संलग्न
🔹 १०० % प्लेसमेंट

*प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन वेबसाईट*

🌍 मुंबई विद्यापीठ : https://muugadmission.samarth.edu.in/
🌍 महाविद्यालय : www.pbvm.co.in

📌 *संचालक मंडळ*

🔸 अध्यक्ष : श्री. पुष्कराज कोले
🔸 उपाध्यक्ष : श्री. प्रकाश जैतपकर
🔸 कार्याध्यक्ष : श्री. मोहन प्रभू
🔸 सचिव : डॉ. अरुण गोडकर
🔸 प्राचार्य : डॉ. श्रीकांत सावंत

*☎️ प्रवेशासाठी संपर्क :*

*📲 तुषार मठकर : 9158971687*
*📲 निखिल सोनार : 7887488669*
*📲 डॉ. गोडकर : 9175142027*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा