रोणापाल जंगलात आढळलेल्या “त्या” अमेरिकन महिलेला उपचारासाठी रत्नागिरी हलविले…
बांदा
रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या “त्या” अमेरिकन महिलेला काल रात्री उशिरा अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग मधून रत्नागिरी येथे मानसिक रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती बांदा पोलिसांनी दिली. तिची मानसिक स्थिती नसल्याने तिला सुरुवातीला सावंतवाडी येथून ओरोस येथे तेथून गोवा-बांबोळी येथे हलविले होते. मात्र तेथे उपचार केल्यावर तिला परत बुधवारी रात्री सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. काल रात्री तिला परत अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविले आहे. संबंधित महिला माहिती देत नसल्याने पोलिसांसमोर तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.