सावंतवाडी:
चराठे गावठाणवाडी येथील शेतकरी श्री यशवंत गणपत बिर्जे यांचे राहत्या घराची भिंत कोसळून स्वतः श्री यशवंत बिर्जे व त्यांचा मुलगा गणपत बिर्जे हे दोघे ढिगार्याखाली सापडून जखमी झाले. दरम्यान नुकसान झालेल्या श्री बिर्जे यांना भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी तातडीची आर्थिक मदत केली. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना व्हिजन हॉस्पिटल मध्ये स्वखर्चाने मदतीसाठी आश्वासन देखील श्री.परब यांनी दिले.
यावेळी चराठा उपसरपंच अमित परब माजी पंचायत समिती सदस्य, गौरी पावसकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील परब, संतोष कोठावळे, ओमकार पावसकर, बाळा बोंद्रे, सुरेश परब, तनवी परब, सुरेश कोठावळे, आदी उपस्थित होते.