You are currently viewing गुरुकुल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा गुरुभिवादन सोहळा उत्साहात साजरा

गुरुकुल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा गुरुभिवादन सोहळा उत्साहात साजरा

सावंतवाडी :

 

दिप्तेश मेस्त्री संचलित गुरुकुल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा गुरुभिवादन सोहळा २०२४ भगवती हॉल मळगाव तेथे उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी आपली संगीत कला सादर करीत उपस्थित रसिकांची मने जिंकली.

या सोहळ्याचे उद्घाटन गुरुमाऊली दिपतेश मेस्त्री, अँड सचिन गावडे आणि परिवारातील जेष्ठ मंडळीसह विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गुरुकुल संस्थेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. गुरुकुल संस्थेच्या सर्व पदाधिकारी व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, गुलाब पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार झाले. यावेळी या सोहळ्यातील प्रमुख अतिथी राजघराण्याचे राजेंद्रस्वामी भारती महाराज यांची व गुरुमाऊली यांची मातोश्री यांची चरण पूजा करण्यात आली. त्यानंतर गुरुमाऊलींनी स्वरानुभूती गायन बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे गायन झाले. विद्यार्थ्यांच्या या सुश्राव्य गायनाने उपस्थितांना मोहिनी घातली.

या सोहळ्यामध्ये गुरुकुल संस्थेच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. अँड सचिन गावडे यांनी मनोगत व्यक्त करून या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यामध्ये बंड्या धारगळकर, योगेश प्रभू, मोहन मेस्त्री, महेंद्र मांद्रेकर, प्रदीप वाळके, यमेश खवणेकर, राजेश गुरव, आनंद मोर्ये, गजानन मेस्त्री, प्रसाद मेस्त्री, अमित मेस्त्री, महेंद्र मान्द्रेकर, प्रदीप वाळके, यमेश खवणेकर, बाळू कांडरकर, नीरज भोंसले, रूपेंद्र परब, सचिन देसाई, अक्षय सरवणकर, महेश सावंत, मंगेश मेस्त्री, केतकी सावंत, सर्वेश राऊळ, मनीष पवार , संजय गावडे, कवी कृष्णा देवळी, सुधीर राऊळ यांच्यासह संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंत व कलाकारांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.

या सोहळ्यामध्ये भावेश राणे आणि मनीष तांबोस्कर यांची पखवाज तबला जुगलबंधी खास आकर्षण ठरली. गुरुपूजन सोहळा अतिशय भक्तिमय स्वरूपात संपन्न झाला. या सोहळ्याचे थेट सोहळा लाईव्ह प्रक्षेपणही प्रसारीत करण्यात आले होते. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन काका सावंत, अक्षय सातार्डेकर यांनी केले. या सोहळ्याला सिंधुदुर्ग गोवा राज्यातील मुलांचा व कलाकारांनी सहभाग घेतला, अजित पोळजी, पुरुषोत्तम परब व शिष्य यांनी गुरुमाऊली यांचेवर काव्यारचना करून सादरीकरण केले, आभार श्री आडेलकर सर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा