You are currently viewing लोकसभेत विरोधी पक्षनेते  राहुलजी गांधी यांना जात विचारणाऱ्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजपचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसकडून निषेध.

लोकसभेत विरोधी पक्षनेते  राहुलजी गांधी यांना जात विचारणाऱ्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजपचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसकडून निषेध.

लोकसभेत विरोधी पक्षनेते  राहुलजी गांधी यांना जात विचारणाऱ्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजपचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसकडून निषेध.

जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली ‌जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

सिंधुदुर्ग

लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार श्री. राहुलजी गांधी यांना जात विचारणाऱ्या चातुर्वर्णी व्यवस्था मानणाऱ्या मनुवादी भाजप विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाध्यक्ष श्री. इर्शादभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राहूल गांधी यांना जात विचारून अपमान करणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा निषेध आसो अनुराग ठाकूर मुर्दाबाद भाजपच्या मनुवादी वृत्तीचा निषेध असो जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. व अनुराग ठाकूरच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

यावेळी यावेळी प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, कार्याध्यक्ष विलास गावडे,प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर,मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, रवींद्र म्हापसेकर,प्रकाश डिचोलकर, तुषार भाबल, सुंदर सावंत, संजय लाड, शिवा गावडे, बाबू गवस,चंद्रकांत राणे, समीर वंजारी, काका मांजरेकर, जेम्स फर्नांडिस, कमलाकांत हिंदळेकर, मधुकर लुडबे, आपा चव्हाण, हेमंत माळकर, सरदार ताजर, दिलीप नारकर,तबरेज शेख, अहमद बोबडे,प्रथमेश परब,नागेश चव्हाण, बबन डिसोजा,केरोबीन डिसोजा,कॅलेस्टन डिसोजा इत्यादी उपस्थित होते.

त्यानंतर ‌ जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात असे नमूद आहे की, सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष व इंडीया आघाडीतील मित्र पक्ष जातीनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध आहेत परंतू भारतीय जनता पक्षाचा जातीनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे. विरोधी पक्षनेते मा.खा. श्री राहुलजी गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी मा.खा.राहूलजी गांधीना जात विचारून त्यांचा अपमान केला आहे. जात धर्माच्या आधारावर राजकारण करणे हाच भाजपचा अजेंडा आहे.

मा. खा. राहूलजी गांधी यांची जात विचारणारे लोक त्याच विचारसरणीचे आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला,हे तेच लोक आहेत ज्यांनी आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे,पेरियार, विठ्ठल रामजी शिंदे, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या कार्यात विघ्न आणले.या महापुरुषांनी समाजातील वंचित, दलित दुबळ्यांचा आक्रोश मांडला, त्या सर्वांचा अपमान, छळ, अश्लाघ्य टिकेला सामोरे जावे लागले. आज 21 व्या शतकातही ही मनुवादीवृत्ती डोके वर काढत आहे, तेच लोकसभेत भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी दाखवले आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर अनुराग ठाकूरच्या विधानाचे कौतुक केले आहे हे त्याहून गंभीर आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती जात धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या विधानाचे समर्थन करते हे या देशाचे दुर्दैव आहे. संविधानासमोर नतमस्तक होऊन शपथविधी घेणारे देशाचे पंतप्रधान खोटारडे आहेत हे पुन्हा एकदा त्यांनीच त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे.मा.खा.राहूलजी गांधी यांनी सामाजिक सुधारणेचे रणशिंग पुकारले आहे. भारतीय जनता पक्षाने कितीही विरोध केला, शिव्या दिल्या,अडथळा आणला तरीही जातीनिहाय जनगणना होणारच आहे.
मा.खा.राहूलजी गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान करणाऱ्या अनुराग ठाकूर व त्यांच्या विधानाचे समर्थन करणारे नरेंद्र मोदी यांचा सिंधुदुर्ग काँग्रेस तीव्र निषेध करीत आहे. हा आमचा निषेध नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत आपण पोहोचवावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

________________________________

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा