You are currently viewing कुडाळ इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल मध्ये शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा

कुडाळ इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल मध्ये शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा

कुडाळ :

क.म.शि.प्र. मंडळ इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल कुडाळ येथे दिनांक 22 जुलै ते 28 जुलै पर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. दिनांक 22 जुलैला प्रशालेतील शिक्षकानी आपल्या विषयाशी संबंधित अध्यापन साहित्याचे प्रदर्शन मांडले व तसेच त्या अध्यापन साहित्याचे वर्गात सादरीकरण करून मुलांना त्याविषयी माहिती दिली. दिनांक 23 जुलैला FLN / संख्या ज्ञान साक्षरता दिवस म्हणून गणित विषयाच्या शिक्षकांनी वर्गामध्ये विद्यार्थ्यांसोबत संख्याज्ञानाचे प्रात्यक्षिक केले तसेच विद्यार्थ्यांकडून संख्या वाचन करून घेतले. दिनांक 24 जुलैला प्रशालेत क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात यामध्ये आला लहान मुलांनी भारतीय खेळ असलेले नोंदी, दोरी उड्या, गुट्टी, साखळी, लंगडी, लगोरी, चील झपट्टा यांसारखे खेळ खेळण्यात आले. दिनांक 25 जुलैला प्रशालेत सांस्कृतिक दिवस साजरा केला यामध्ये लहान मुलांनी नृत्य, वेशभूषा, फुगडीचें प्रकार अश्या विविध गोष्टी मध्ये लहान विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. खाद्यपदार्थ दिवस असल्याने भेळ बनवून घेण्यात आली यामधे विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.

 

तसेच स्थानिक कलाकार प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून पिंगुळी मधील ठाकर आदिवासी कला आगांन चे श्री.चेतन गंगावणे यांनी लहान विद्यार्थ्यांना कळसूत्री बाहुलीचा खेळ या विषयी माहिती देण्यात आली व खेळ दाखवण्यात आले. मोठ्या विदयार्थी साठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये माझे गाव, फुगड्या खेळणाऱ्या महिला या विषयावर विद्यार्थ्यांनी सुंदर चित्र काढली तसेच विद्यार्थ्यांनी लोककलेवर आधारित फुगडीचे सादरीकरण केले. दिनांक 26 जुलैला कोशल्य उपक्रम आधारित विद्यार्थ्यांकडून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करून घेण्यात आल्या व प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यानी हाताच्या ठश्यानी विविध प्रकारचे नक्षीकाम केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली तसेच डिजिटल उपक्रम चे आयोजन करण्यात आले.

 

दिनांक 27 जुलैला इको क्लब मिशन या उपक्रम वर आधारित लहान मुलांनी कोलाज काम, पानांच्या ठष्यापासून नक्षी, वृक्षारोपण, पोषण दिवस साजरा करताना विद्यार्थ्यांनी डब्यातून पालेभाज्या, भाकरी, मोड आलेली कडधान्य, फळे, सुका मेवा, डाळी इत्यादी सारखे पोषक खाद्य पदार्थ आणले. कचऱ्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याविषयी शैक्षणिक माहिती देणारे बूथ केंद्र तयार केले. तसेच विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धनाचे निबंध आणि इतर प्रकारचे साहित्य तयार केले या विषयावर चित्र स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले. प्लास्टिक वापराच्या जाणीव जागृतीसाठी पोस्टर मेकिंग, घोषवाक्य आयोजित केली आणि रॅलीचे आयोजन केले. वर्गामध्ये ओला कचरा सुका कचरा यासाठी कचरापेटी प्रणाली राबवली. दिनांक शेवटच्या दिवशी पालकांनी देणगी देऊन या उपक्रमात आपला ही सहभाग नोंदविला.

 

सदर शिक्षण सप्ताह आयोजित करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम मुमताज शेख मॅडम यांनी उत्कृष्ट प्रकारे नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा