*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दीप अमावस्या*
तिमिर घालवाया
उजळायचे आहे दीप
जायचे समीप
प्रकाशाच्या…..
अज्ञानाचा नाश
ज्ञान मिळवून करावा
जीवनाचा घडावा
कायापालट ……
मनाचा दीपक
लख्ख करावा घासून
विचार चेतवून
चैतन्यमय….
निर्मळ देव्हाऱ्यात
ज्योत मंद तेवता
गाभारा भरता
उजेडाने…..
सण प्रतिकात्मक
मिळते त्यातून शिकवण
ठेवावे आचरण
दीपासम…..।।
~~~~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार@✍️