You are currently viewing माजी खा. निलेश राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मसुरेत वह्या वाटप.

माजी खा. निलेश राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मसुरेत वह्या वाटप.

 

मसुरे :

माजी खासदार निलेश राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मसुरेतील जिल्हा परिषदेच्या प्रशाले मध्ये सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी मसुरे येथील केंद्र शाळा मसुरे नंबर एक, जिल्हा परिषद शाळा मागवणे, जिल्हा परिषद शाळा कावावाडी या प्रशालेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वया वाटप करण्यात आले.

यावेळी सरोज परब बोलताना म्हणाल्यात माजी खासदार निलेश राणे आणि पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना सहकार्य म्हणून हे शैक्षणिक साहित्य आम्ही दिले आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या या संधीचा उपयोग करून आपली शैक्षणिक उन्नती वाढवावी आणि आपल्या प्रशालेचे आणि गावाचे नाव उज्वल करावे.

माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर म्हणाल्यात लोकप्रिय माजी खासदार निलेश राणे आणि जनतेशी नाळ जोडलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी आज ह्या वहया तुम्हाला दिलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. यापुढे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि लोकप्रिय माजी खासदार निलेश राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे यांच्या सहकार्यातून येथील विविध शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा आम्हा सर्वांचा नेहमीच प्रयत्न राहील. मसुरे केंद्र शाळा येथे प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका शर्वरी सावंत यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ गावडे यांनी केले. जिल्हा परिषद कावा शाळा येथे सौ सुखदा मेहंदळे मॅडम यांनी तर मसुरे मागवणे शाळा येथे श्रीमती संजीवनी राहुळ मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी माझी जि प अध्यक्ष सौ सरोज परब, मसुरे माजी सरपंच लक्ष्मीताई पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य विलास मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, उद्योजक महेश बागवे, तात्या हिंदळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मसुरे सौ शितल मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दूखंडे, हेमलता दुखंडे, शिवाजी परब, सचिन पाटकर, गोपाळ गावडे, रामेश्वरी मगर, सौ. बेडेकर मॅडम, बाबुराव गोलतकर, श्री पेडणेकर,श्री आंबेरकर, रिया परब, वैद्यही बागवे, मागवणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिव्या सावंत आदी मान्यवर तसेच सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व प्रशालेंच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने माजी खासदार निलेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा