नवरात्रो उत्सवाच्या गाईडलाईन जाहीर करण्या बाबत भाजप आमदार आशिष शेलार यांचे सरकारला पत्र..

नवरात्रो उत्सवाच्या गाईडलाईन जाहीर करण्या बाबत भाजप आमदार आशिष शेलार यांचे सरकारला पत्र..

गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. मुंबईमध्ये मुंबई शहरातही देवीच्या मूर्ती घडविण्यास सुरुवात करत आहेत. कोरोनामुळे आधीच मूर्तिकारांना मोठा फटका बसला आहे.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तीची उंची किती असणार ? नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? याबाबत मूर्तिकारांना वेळेस माहिती मिळण्याची आवश्यकता आहे.
मूर्तीच्या उंची बाबत स्पष्टता होण्यास उशीर झाल्याने यंदा चार फुटांपेक्षा उंच असलेल्या अनेक मूर्ती गणपतीच्या काळात कारखान्यात शिल्लक आहेत.
मुंबई शहरात देवीच्या मूर्ती घडवणारे सुमारे ५ हजार मूर्तिकार व कारखाने आहेत.तसेच मोठ्या संख्येने कारखाने आणि कामगार असलेल्या पेण मधील दोहे, हरामपुर, केळवे या गावांचे आर्थिक नुकसान २० ते २५ कोटींचे आहे.

गणेश उत्सवाचे नियम या उत्सवलही लागू असतील का?की त्यात बदल होणार आहेत?मूर्तिकार आता देवीच्या मूर्ती घडविणारं असल्याने वेळीच सरकार ने स्पष्ट करावं
कारण या व्यवसायावर हजारो कामगार वर्गाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने वेळीच नियमावली जाहीर करावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारला पत्रातून केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा