*के.एल.पोंदाच्या १०वीच्या विद्यार्थ्यांना ध्यास प्रतिष्ठान तर्फे गाईड वाटप*
डहाणू..
के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथील, इयत्ता १०वीच्या गरजू विद्यार्थ्यांना ध्यास प्रतिष्ठान वस ई ,वाडा संस्थेच्या माध्यमातून जागर सावित्रीचा कार्यक्रमा अंतर्गत मा.श्री.बाळकृषण रामचंद्र गोरे यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने १४हजार रुपये किंमतीची १०वी चे गाईड गरजू विद्यार्थ्यांना वाटपकरण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन तसेच सूत्रसंचलन शाळेच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका अनुपमा जाधव यांनी केले. या उपक्रमामुळे सर्व आनंदीत झाले.या पुस्तकांचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.
सर्व प्रथम विद्यार्थींनींनी आपल्या मधुर आवाजात स्वागत गीत सादर केले.नंतर पाहुण्यांचे स्वागत शाल, पुष्पगुच्छ व अनुपमा जाधव यांनी लिहिलेले रानझरा हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
मा.प्राचार्य श्री.सोपान इंगळे सर यांनी आपलं प्रास्ताविक व्यक्त केले.अशा वेगवेगळ्या उपक्रमा बद्दल आनंद व्यक्त केला.विदयारर्थींनी चांगला अभ्यास करावा. जास्तीत जास्त वाचन करावे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सौ.अंजना धनंजय सावे, माजी विस्तार अधिकारी उपस्थित होत्या.तर प्रमुख व्याख्याते म्हणून मा.श्री.संजय पासलकर उद्योजक श्री.प्रिकास्ट इंडस्ट्रीज विरार. हे उपस्थित होते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.रमेश पांडुरंग तांबे साहित्यिक उपस्थित होते.
यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा व सावित्रीबाई फुले, गाडगेबाबा यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.तसेच विविध प्रकारच्या कविता सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमामुळे जणू कवितांचा पाऊसच बरसला!
सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच मा.श्री.रमेश तांबे यांनी आपली पुस्तके ग्रंथालयास भेट दिली.
या कार्यक्रमात शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा.सौ.रसिका घागस, पर्यवेक्षक मा.सुनील मोरे सर,पर्यवेक्षिका मा.सौ.मनिषा पटेल,शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
अतिशय आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
______________________________
*संवाद मिडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*