You are currently viewing खाजगी गाड्याकडून होणारी प्रवाशांची लुट थांबवा*… ॲड. नकुल पार्सेकर

खाजगी गाड्याकडून होणारी प्रवाशांची लुट थांबवा*… ॲड. नकुल पार्सेकर

*खाजगी गाड्याकडून होणारी प्रवाशांची लुट थांबवा*… अॅड. नकुल पार्सेकर

सिंधुदुर्गनगरी

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बहुतांश गाड्या कडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लुट सुरू असून उप- प्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यानी तातडीने कठोर कारवाई करुन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्गचे अशासकीय सदस्य अॅड. नकुल पार्सेकर यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय, काॅन्फरन्स सभागृहात मा. जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सभेत श्री पार्सेकर यांनी खाजगी वहानांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट केली जात आहे. विशेषतः गणेश चतुर्थी सारख्या सणासुदीच्या काळात गाडीचे सावंतवाडी पुणे भाडे अडीच हजारांच्या घरात असते . एरवी हेच भाडे चारशे ते पाचशे असते. त्यामुळे उप-प्रादेशिक अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन अशा गाड्यांचे परवाने रद्द करावेत. एक वर्षापूर्वी अशी कठोर कारवाई पुणे येथील परिवहन आयुक्तांनी केलेली होती त्यामुळे याला थोडा चाप बसला होता. या बैठकीला उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विजय काळे यांनी याबाबत ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ.सई लळित यांच्याकडे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत काही समस्या मांडल्या तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एसटी डेपोंची दुरावस्था याबाबत गंभीर चर्चा करण्यात आली असून उपस्थित असलेल्या संबंधित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल पुढच्या बैठकीत सादर करण्याचे आदेश ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिले.
बैठकीत वीज वितरण, भारत संचार निगम लिमिटेड अशा आस्थापनेतील सेवा बाबतच्या ग्राहकांच्या दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या तक्रारीबाबत आढावा घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा