रेशनकार्ड साठी पैसे मागणाऱ्या देवगडमधील ज्या भ्रष्ट अधिकाऱ्याची बदली करा
आमदार नितेश राणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
देवगड तालुक्यातील तहसील कार्यालय पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी चव्हाण हे रेशनकार्ड चे काम करण्यासाठी उघडपणे पैशाची मागणी करून सर्वसाधारण जनतेला नाहक त्रास देत आहेत.
याबाबत आमदार नितेश राणे यांनी योग्य ती दखल घेऊन सदर भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची त्वरित आपल्या मतदारसंघाच्या बाहेर बदली करण्यात यावी,व सदर अधिकारी याच्याकडे यापुढे पुरवठा विभागाचा पदभार देऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे करण्यात आली आहे.
देवगड प्रतिनिधी