You are currently viewing आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

वाकड, पुणे-(प्रतिनिधी)

पोस्टल कॉलनी वाकड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि २८ जुलै रोजी बर्ड व्हॅली वाकड सभागृहात वाजता संपन्न झाली.

यात पहिल्या सत्राची सुरुवात राष्ट्रगीताने होऊन त्यानंतर मागील महिन्यात देवाज्ञा झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.मयूरभाऊ कलाटे मा नगरसेवक पिंपरी चिंचवड, सौ स्वातीताई कलाटे मा. नगरसेविका पिंपरी चिंचवड,मा वृषाली मरळ, अध्यक्षा ज्येष्ठ नागरिक महासंघ,विरंगुळा केंद्र, वेणूनगर ,अध्यक्षस्थानी आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री भागवत कोल्हे हे होते.

श्री मयूर भाऊ कलाटे ह्यांच्या हस्ते सरस्वती पूजन होऊन दीप प्रज्वलन झाले. गणेश वंदना,सरस्वती वंदना,स्वागत गीत,महाराष्ट्र गीत होऊन त्यानंतर मान्यवरांचा स्वागत आणि सत्कारांचा कार्यक्रम संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री भागवत कोल्हे,श्री लहाने,श्री बोरकर,श्री प्रवीण कुलकर्णी,श्री तेली,श्री बह्राटे,सौ बोरकर, सौ कळमकर आणि अन्य कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते पार पडला.

75 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी श्रीमती शैलजा कामत यांनी मनोगत व्यक्त केले.

संघासाठी विशेष योगदान करणाऱ्या सौ शोभा गाडेकर, श्री अशोक बोंडे,श्री अप्पासाहेब तेली,तसेच सांस्कृतिक कार्यक्रम समिती मार्फत गीत सादर करणाऱ्या महिला सौ मीरा बोरकर,सौ छाया निकुंभ,सौ अलका कळमकर, सौ चित्रा बर्हाटे,सौ हेमांगी बोंडे, श्रीमती सुनीता सफाई,सौ रुबी पूरकायस्थ, श्री,विजया चौधरी,सौ हर्षाली देसाई, सौ पुष्पा ढवळे, श्रीमती विभा दरेकर, सौ प्रतिभा गवळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.

अहवाल पत्रिकेसाठी जाहिराती गोळा करणारे श्री प्रवीण कुलकर्णी, श्री सुरेश बोरकर, डॉ रमेशचंद्र बियाणी,श्री अप्पासाहेब तेली,श्री उत्तमचंद्र चोरडिया, श्री श्रीकांत रेवणकर,श्री माधव बर्हाटे,श्री विनोदकुमार तिवारी,श्री दिगंबर आळणे,श्री राजेंद्र देसाई तसेच जाहिरात देणाऱ्या सौ सारिका हातेकर,सौ आरती टेकाडे यांचा सत्कार प्रमुख पाहुणे मयूर भाऊ कलाटे आणि मा वृषाली मारळ यांच्या हस्ते करण्यात आला.

तर संघाच्या उपक्रमांना प्रसिद्धी देणारे प्रमुख वार्ताहर श्री बाबू डिसोजा,वृत्तपत्रांसाठी च्या छायाचित्रकार माधुरी डिसोजा यांचा सत्कार मा वृषाली मरळ यांनी केला. प्रसिद्धी विभाग उत्कृष्ट पणे सांभाळणाऱ्या श्री अशोक बोंडे, सौ. हेमांगी बोंडे यांचा सन्मान करण्यात आला.

सौ स्वाती कलाटे आणि मा वृषाली मगर यांनी मनोगत व्यक्त केले.

दुसऱ्या सत्रात अहवाल वाचन झाले.यात मागील महिन्याचा वृत्तांत वाचन- श्री बोरकर, सन2023-24 चा वार्षिक अहवाल वाचन -श्री लहाने,31 मार्च20 24 अखेरचा ताळेबंद आणि उत्पन्न व खर्च वाचन -श्री बऱ्हाटे सन2024- 25 या आर्थिक वर्षा साठी अंतर्गत हिशोब तपासनीस नेमणे -श्री बोरकर यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री गिरमे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा