You are currently viewing कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतून ४० उमेदवारी अर्ज मागे

कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतून ४० उमेदवारी अर्ज मागे

कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  ६९ जागांसाठी १६४ उमेदवार रिंगणात…

कुडाळ
कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या ७३ जागांसाठी निवडणुकीसाठी २०८ अर्जापैकी ४० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले व ४ उमेदवार बिनविरोध झाले आहेत त्यामुळे आता ६९ जागांसाठी १६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. अशी माहिती कुडाळ निवडणूक विभागाने दिली.
कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी, कुपवडे , वाडोस, गोठोस, वसोली, पोखरण- कुसबे, आकेरी, गिरगाव- कुसगाव, गोवेरी या ग्रामपंचायतींसाठी १५ मार्च रोजी मतदान होणार आहे.

नऊ ग्रामपंचायतीच्या ७३ जागांसाठी २१६ अर्ज आले होते. अर्ज छाननी वेळी अर्ज ८अर्ज अवैध तर २०८ अर्ज वैध ठरले होते. सोमवारी सायंकाळी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती.यामध्ये ४० उमेद्वारांनी अर्ज मागे घेतले. यात जण बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे आता ६९ जांगासाठीच निवडणूक होणार असून त्यासाठी १६४ उमेदवार निवडून रिंगणात राहिले आहेत.
माड्याचीवाडी (सदस्य संख्या 9) या ग्रामपंचायती करीता २२ पैकी तीन जणांनी अर्ज मागे घेतल्याने १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहीले आहेत.
कुपवडे ( 7) या ग्रामपंचायती मध्ये २६ पैकी ९ जणांनी अर्ज मागे घेतल्याने 17 उमेदवार , वाडोस ( 9) या ग्रामपंचायतीत २९ पैकी १० जणांनी अर्ज मागे घेतल्याने १९ उमेदवार
गोठोस ( 9) या ग्रामपंचायतीत २० पैकी ४ जणांनी अर्ज मागे घेतल्याने 16 उमेदवार , वसोलीत ( 7) १५ पैकी १ जणांनी अर्ज मागे घेतल्याने 18 उमेदवार पोखरण- (9) 20 पैकी 2 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 18 उमेदवार आकेरी (9) 35 पैकी 4 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 31 उमेदवार, गिरगाव – ( 9) 18 पैकी एकाने अर्ज मागे घेतल्याने 17 उमेदवार , गोवेरी ( 7) 23 पैकी 6 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहीले आहेत.

पोखरण कुसबे येथील प्रभाग क्र. 1 मध्ये विजय सोनु म्हाडेश्वर यांचा एकच अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.
माड्याची वाडी येथील प्रभाग क्र. 3 मध्ये रंजना गोडे यांचा अर्ज अवैद्य ठरल्याने कांचन डिचोलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच गोठोस येथील प्रभाग क्र. 3 मध्ये ख्रिस्तीलिना डिसोजा यांनी अर्ज मागे घेतल्याने वैशाली भितये व वैशाली धुरी या दोघेही बिनविरोध निवडून आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा