रेशन धान्य संदर्भात काँग्रेस पदाधिकारी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
धान्य पुरवठा सुरळीत होईल, जिल्हाधिकारी यांचे आश्वासन
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष
इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली रेशन धान्य संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी धान्य पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन काँग्रेस पदाधिकारी यांना दिले.
जुलै महिन्याच्या २४ तारखेपासून सर्व्हर प्रॉब्लेममुळे धान्य वितरण पूर्णपणे ठप्प झालेले आहे. यामुळे सामान्य गरजू रेशनधारकांना दिवसातून ४ वेळा दुकानात येऊन जावे धान्य वितरणासाठी लागत आहे. शासनाने ऑफलाईनची सुविधाही पूर्णपूर्ण बंद केलेली आहे.
फक्त ३ दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. या दिवसात कशा पद्धतीने धान्य वाटप करायचे ? कारण अद्यापपर्यंत सर्व्हर चालू झालेला नाही. या दोन दिवसात सर्व्हर चालू न झाल्यास सरासरी आपल्या जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानाचे ७० ते ८०% लोक धान्यापासून वंचित राहतील. ही गांभीर्याची बाब आहे.
तरी आपल्या जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन ज्यावेळी महिन्याच्या अखेरीस सर्व्हरची अशी परिस्थिती शेवटच्या पंधरवड्यात निर्माण झाल्यास शासनाने धान्य दुकानदारांना ऑनलाईन मिळत असलेल्या मार्जिनसहीत ऑफलाईन देण्याचा लेखी आदेश देऊन ग्राहकांचे हक्काचे असलेले धान्य देण्याची व्यवस्था करावी. असे न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष
इर्शाद शेख, विलास गावडे, विजय प्रभु, विधाता सावंत, श्री. संदेश रामचंद्र कोयंडे, जेम्स सम्यमन् फर्नाडीस, श्री लक्ष्मीकांत महादेव परुळेकर, श्री अंकुश मलबेरी, श्री प्रथमेश परब, श्री मयुर आरोलकर, तबरेज रियाज शेख, श्री. किरण हरिचंद्र टेंबलकर, श्री. प्रकाश जैतापकर, श्री. नागेश मोर्वे, विनायक मेस्त्री, विजय सावंत, बाबा काझी, विजय सावंत उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU मध्ये पदवी शिक्षण…. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻🎓*
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२४-२५ वर्षांसाठी प्रवेश सुरु*
*YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾ *बी.ए. / बी.कॉम*
◾ *एम. कॉम*
◾ *एम.ए.(मराठी)*
◾ *एम.ए.(हिंदी)*
◾ *एम.ए.(इंग्लिश)*
◾ *एम.ए.(अर्थशास्त्र)*
◾ *एम.ए.(लोक प्रशासन)*
◾ *एम.ए.(इतिहास)*
◾ *एम.बी.ए.(HR,Fin,Mkt)*
◾ *रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)*
◾ *गा़ंधी विचार दर्शन पदविका*
🔸 *तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
*📌10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी*
💁🏻♀️ *स्पर्धा परीक्षा(उदा. MPSC, UPSC) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
♦️ *RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशसाठी आजच संपर्क करा*👇
*🔹मुख्य प्रवेश कार्यालय🔹*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज*
*आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज गेट नं 2 समोर,*
*आनंदी कॉम्प्युटर शेजारी,*
*सावंतवाडी नगरपालिकेजवळ,* *सावंतवाडी*
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
*8605992334 / 9422896699*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*