*सत्यवान यशवंत रेडकर सरांचे ३ व ४ ऑगस्ट रोजी कणकवली तालुक्यात निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान*
कोकण बोर्ड अव्वल स्थानावर येतो परंतु नंतर स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी झळकलेले दिसत नाहीत. परिणामी कोकणातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या प्रवाहात येऊन विविध शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने विविध पदांवर निवड व्हावीत यासाठी सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावाचे भूमिपूत्र, मा. श्री सत्यवान यशवंत रेडकर सामाजिक कार्याचा भाग स्वरूपात कोणतेही मानधन न घेता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन करीत असतात.
शनिवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता, कणकवली महाविद्यालय (आयोजक: कणकवली महाविद्यालय व स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली), रविवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता, माध्यमिक विद्यालय, नाटळ (आयोजक: मराठा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य, मुंबई व कोकण विभाग तसेच कनेडी पंचक्रोशी समूह, कोकण विकास कृती समिती) व सकाळी ११.०० वाजता कणकवली महाविद्यालय येथे (सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग, कणकवली शाखा) यांच्या वतीने निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.