You are currently viewing लोकन्यायालयात मोठ्या संख्येने खटले निकाली

लोकन्यायालयात मोठ्या संख्येने खटले निकाली

*लोकन्यायालयात मोठ्या संख्येने खटले निकाली*

पिंपरी

शनिवार, दिनांक २७ जुलै २०२४ रोजी पिंपरी – चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण आणि पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोशिएशन यांच्या विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरी, नेहरूनगर न्यायालयात २६७ खटले निकाली काढण्यात आले. त्यामुळे २,०३,३४,८२५ रुपये किमतीचे दावे निकाली निघाले; तर आकुर्डी पी सी एम सी न्यायालय येथे ३२४ खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये ९७,६२,८२१ रुपये महसूल जमा झाला; तसेच वाहतूक चलनच्या प्रकरणात १,०३,८०० रुपये दंड जमा झाला. यामध्ये पिंपरी, नेहरूनगर न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. चव्हाण, एल. ए. के. एमुदी, बी.डी. चौखट आणि आकुर्डी न्यायालयात वी. एस. डामरे यांनी कामकाज पाहिले.

कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून तसेच पाहुण्याचे स्वागत करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुशील मंचरकर होते; तर ॲड. संगीता परब यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते यांची भाषणे झाली. त्यांत पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे, ॲड. सुहास पडवळ, ॲड. राजेश पुणेकर यांनी मार्गदर्शन केले. एल. ए. के. एमुदी यांनी लोकन्यायालयात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. ॲड. सुहास पडवळ, ॲड. सतीश गोरडे यांनी लोकन्यायालयाची आवश्यकता, त्याची स्थापना आणि भविष्यात त्याचे महत्त्व पटवून सांगितले; तर ॲड. सुशील मंचरकर यांनी लोकन्यायालयाची संकल्पना, त्याचा इतिहास रामायण आणि महाभारत याचा संदर्भ देत भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान यांची उदाहरणे उद्धृत करीत उपस्थितांना सामंजस्याने वाद कसे मिटवता येतील याचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमात दि पुणे लॅायर्स कंझ्युमर्स को. ॲाप. सोसायटी लिमिटेड नवनिर्वाचित तज्ज्ञ संचालकपदी ॲड. राजेश पुणेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनद्वारे सत्कार करण्यात आला. त्यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने, ॲड. मदनलाल छाजेड, माजी उपाध्यक्ष ॲड. अतुल अडसरे, ॲड. गौरव वाळुंज, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुजाता बीडकर, ॲड. मोनिका गाढवे आणि पिंपरी – चिंचवड युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी, एस. एन. बी. पी. कॅालेजचे विद्यार्थी, नागरिक आणि मोठ्या प्रमाणात वकील बांधव उपस्थित होते. पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲड. अनिकेत खिलनानी, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. संघर्ष सूर्यवंशी आणि ॲड. मानसी उदासी यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, ॲाडिटर ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. फारुख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. मीनल दर्शले यांनी केले. ॲड. धनंजय कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. फारुख शेख यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा