*व्हि.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मध्ये एम. एस.ए.टी. विषयामुळे करिअर निवडण्याची उत्कृष्ट संधी*
*युवा उद्योजक संकेत वेंगुर्लेकर*
बांदा
आपल्या व्हि.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बांदा प्रशाळेत सुरू असलेल्या एम.एस.ए.टी. या व्यावसायिक विषयामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना करिअर निवडण्याची उत्कृष्ट संधी प्राप्त झाली आहे. कोणताही व्यवसाय निवडल्यानंतर त्या व्यवसायामध्ये करत असलेले काम हे कुठच्याही कमी दर्जाचे नसते त्या कामामधील आपले कौशल्य महत्त्वाचे असे मत यशस्वी युवा उद्योजक संकेत वेंगुर्लेकर यांनी व्ही.एन.नाबर स्कूल मधील जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमाला बोलताना व्यक्त केले.
♦️यावेळी व्यासपीठावर प्रशाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ मनाली देसाई, ज्येष्ठ निदेशिका सौ. रिया देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे मुख्य सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
♦️संकेत वेंगुलेकर बोलताना पुढे म्हणाले एम. एस. ए. टी या विषयांमध्ये एक विभाग गृह आरोग्य असा आहे. ज्या विभागामध्ये खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले जाते. यातूनच हॉटेल मॅनेजमेंट सारख्या विषयाकडे वळण्यासाठी मुलांना सुवर्णसंधी प्राप्त होऊ शकते.तसेच त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट मधील विविध विषयांवर संकेत वेंगुर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनाली देसाई त्यांनी सुद्धा आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने सांगितले की कौशल्य विकास अभ्यासक्रमाला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना या विषयासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस एम एस सी टी विभागांमध्ये तयार करण्यात आलेला विविध वस्तूंचे विक्री स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलचे उद्घाटन प्रमुख पाहुणे युवा उद्योजक संकेत वेंगुर्लेकर, यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्टॉलमध्ये ऊर्जा पर्यावरण विभाग, शेती पशुपालन विभाग, गृह आरोग्य विभाग अशा तिन्ही विभागातील प्रात्यक्षिकातून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंची विक्री करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी कुमारी श्रीशा सावंत, सूत्रसंचालन निदेशक भूषण सावंत, तर शेवटी आभार विद्यार्थिनी गीतांजली देसाई मानले.