You are currently viewing सी-आर्म मशीन सह प्रशासकीय मान्यता प्राप्त यंत्र व साधन सामुग्री जिल्हा रुग्णालयास न मिळाल्या आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार- इर्शाद शेख

सी-आर्म मशीन सह प्रशासकीय मान्यता प्राप्त यंत्र व साधन सामुग्री जिल्हा रुग्णालयास न मिळाल्या आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार- इर्शाद शेख

*सी-आर्म मशीन सह प्रशासकीय मान्यता प्राप्त यंत्र व साधन सामुग्री जिल्हा रुग्णालयास न मिळाल्या आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार- इर्शाद शेख*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ऑर्थोपेडिक मशिनरी बंद पडल्याने आर्थोपेडीक शस्त्रक्रिया होत नाहीत या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आवाज उठविण्यात आला होता व जिल्हाधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले होते. जर सी आर्म मशीन तात्काळ आणून आर्थोपेडीक शस्त्रक्रिया सूरू करून गोरगरिब जनतेची होणारी गैरसोय दूर करावी. अन्यथा तमाम सर्वसामान्य जनतेच्या या महत्त्वपूर्ण सेवेसाठी नाईलाजाने काँग्रेसच्या माध्यमातून व जनतेच्या सहभागात तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा 31 मे 2024 रोजी देण्यात आला होता.
या सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. मनोज जोशी यांनी दिनांक 6 जून 2024 रोजी आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांना पत्र पाठविले होते. या पत्रात त्यांनी लिहले होते की, जिल्हा रुग्णालयात सी-आर्म मशीन नसल्यामुळे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात होत नसून रुग्णांना इतरत्र पाठवावे लागते. ही सेवा जिल्हा रुगणालयात तात्काळ सुरू न झाल्यास काँग्रेस मार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या पत्रात पुढे असे नमूद करण्यात आले होते की, शासनाच्या निर्णयानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये राज्य योजना अंतर्गत यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीसाठी रुपये 21304186/- इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रशासकीय मान्यतेमध्ये सी-आर्म मशीनचा समावेश करण्यात आला असून सदर मशीन साठी रुपये 6000000/- इतकी रक्कम एसी देयकाद्वारे कोषागारातून काढून मा. संचालनालयास वर्ग करण्यात आलेली आहे. परंतू सदर सी-आर्म मशीन अद्यापपर्यंत अप्राप्त आहे. तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून रुग्णसेवेत कोणताही अडथळा येवू नये याकरीता सी-आर्म मशीन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी.
वरील पत्र 6 जून 2024 ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गचे अधिष्ठाता यांनी मा. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना पाठवूनही जुलै महिना संपत आला तरी सी-आर्म मशीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग यांना प्राप्त झालेली नाही. सद्या सिंधुदुर्गात मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असून अनेक अपघातही होत आहेत परंतू जिल्हा रुग्णालयात सी-आर्म मशीन नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांना इतरत्र न परवडणाऱ्या खाजगी रुग्णालयात उपचार करून घ्यावे लागत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,सिंधुदुर्ग साठी राज्य योजना अंतर्गत यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीसाठी रुपये 21304186/- इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असताना ही यंत्रसामुग्री आज पर्यंत का खरादी करण्यात आली नाही. महत्प्रयासाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा महायुती सरकारचा डाव तर नाही ना? अशी शंका येते म्हणून येत्या महिन्याभरात सी-आर्म मशीनसह प्रशासकीय मान्यता प्राप्त सर्व यंत्रसामुग्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे प्राप्त न झाल्यास कोणतीही पूर्व सुचना न देता मा. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी मा. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
______________________________
*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*

🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*

कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा